गणेशमूर्तींसह गौरीचे मुखवटे बनवण्याची तयारी शेवटच्या टप्प्यात.
मुखवटे बनविण्यात महिला अग्रेसर.
पीओपी आणि नियमावलीतील शिथिलतेमुळे व्यवसाय तेजीत
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील
गणपतीं पाठोपाठ घरामध्ये आगमन होणाऱ्या गौराईचे मुखवटे बनवण्याची तयारी देखील आता जोरदार सुरू झाली आहे. गौराईच्या मातीच्या मुखवट्याना मोठ्या प्रमाणात मागणी असुन हे मुखवटे बनविण्यात महिलांचा खारीचा वाटा आहे.
अनेक ठिकाणी तेरड्याच्या झाडांची तर काही ठिकाणी पुठ्याच्या कागदावर रंगरंगोटी करून गौराईला सजवले जाते.
पेणमध्ये बऱ्याच ठिकाणी मातीचे गौराईचे मुखवटे बनवले जातात. या मुखवट्याना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
ज्यावेळी या गौराई आपल्या घरात प्रवेश करतात त्यावेळी त्यावेळी दरवाजापासुन जेथे गौराई विराजमान केली जाते तिथपर्यंत लक्ष्मीची पावले काढली जातात. गौराई ही माहेरवाशीण म्हणुन ओळखली जात असून माहेरी आलेल्या या गौराईला साडी नेसुन, दागिने चढऊन जेवणाचा नैवेद्य दाखविला जातो.
मागील दोन वर्षांत कोरोना विषाणूमुळे या गौराईच्या मुखवट्याच्या व्यवसायावर मंदीचे सावट होते. त्यामुळे या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान देखील झाले होते.
यावर्षी ही मंदी उठविल्यामुळे आणि गणेशोत्सव सण थाटामाटात साजरा करण्याचे शासनाचे आदेश आल्याने यावर्षी या मुखवट्याना चांगल्या प्रकारे मागणी आहे.
साधारण हे मुखवटे दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत असून संपूर्ण गौराईची जोडी पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत विकली जाते.
या विकल्या जाणाऱ्या या गौराई मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, डोंबिवली अश्या अनेक शहरांतून आलेल्या ऑर्डर प्रमाणे सुखरूप पोहोचविले जातात.
एका कारखान्यात महिला - पुरुष असे सुमारे वीस ते पंचवीस कामगार एकत्र येऊन काम करत असतात. या सर्व कामगारांचा एकत्रीत हातभार हे मुखवटे बनविण्यात असतो.
एक मुर्ती बनवण्यासाठी म्हणजेच साचातून काढण्यापासून फोल्डिंग, कापडकाम, पेंटिंग, लेकर लावणे आणि गाडीत भरेपर्यंत एक दिवस लागतो.
यावर्षी व्यावसायिकांना चांगला फायदा झाला असुन चांगल्या प्रकारे मागणी आली आहे.
यावेळी महिला मूर्तिकार अमृता गावंड यांनी सांगितले की,
"' सुरुवातीपासून असणारी आवड आणि त्यातच दोन भावांची, वडिलांची मिळालेली साथ, यामुळे मी मागील पंधरा वर्षांपासून या व्यवसायात आहे. आमचे हे मुखवटे बनविण्याचे काम वर्षभर चालूच असते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे खुप आर्थिक संकट आले होते, मात्र यावेळी नियम देखील शिथिल झाले आहेत आणि पीओपी वरील बंदी देखील उठल्याने मुखवटे आणि पूर्ण शरीर अशा जवळ्पास तेरा हजार ग्राहकांच्या ऑर्डर आम्हाला मिळाल्या आहेत."'