तब्बल दोन वर्षाच्या कोरोना मुळे खंड पडलेला शेतकऱ्यांचा पोळा सण उत्साहात जऊळका येथे साजरा करण्यात आला असून आज दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा ग्रामपंचायत जवळ साजरा करून सहभागी बालकांना शेतकरी उत्पादक कंपनीने प्रोत्साहित करून बक्षीस दिले.

    जऊळका येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पोळा सना सोबत तान्हा पोळा ग्रामपंचायत जवळ आयोजित करण्यात आला होता.या पोळ्या मध्ये पूर्ण गावामधून लहान बालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.तेव्हा आयोजकांनी विविध बक्षीस जाहीर करून दिलीत तर जऊळका शेतकरी उत्पादक कंपनीने सर्व सहभागी असलेल्यापैकी ज्या मुलांनी स्वतः हाताने तयार करून आणलेल्या व खासकरून मातीच्या बैल जोडीला प्रत्येकी १०१ रुपये प्रोत्साहन पार बक्षीस वितरण करण्यात आले.कंपनीने मुलांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या बैलजोड्या बनवणाऱ्या मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यात यावा यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे सांगण्यात आले.हे प्रोत्साहन पर बक्षीस जऊळका शेतकरी उत्पादक कंपनीचे डायरेक्टर रवींद्र सुडके यांनी वितरित केले.आणि पुढे असेच लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध कार्यक्रम राबविणार असे मत यावेळी व्यक्त केले.