मुंबई: दि.२७. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री मुंबई येथे दि.२७ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशि संवाद साधला. जिल्ह्यातील रिक्त असलेली पदे, आगामी काळातील निवडणुका या संदर्भात सविस्तर चर्चा केली.
तसेच आगामी काळात बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांनी सभेसाठी वेळ देण्यात यावा अशी विनंती सर्वानुमते करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, सह संपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, माजी जि. प. स. तथा शिवसेना गटनेचे आशिष रहाटे, मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती निंबाजी पांडव, किशोर गारोळे, ईश्वर पांडव यांची प्रमुख उपस्थिती होती.