शिरुर: शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा देता येईल. यासाठी पुढील काळात मी प्रयत्न करीन असे प्रतिपादन नवनियुक्त चेअरमन शिवाजी दौंडकर यांनी केले. आंबळे-कळवंतवाडी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यामंध्ये सर्वानुमते चेअरमनपदी शिवाजी शंकर दौंडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा ते बोलत होते. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

यावेळी सरपंच सोमनाथ बेंद्रे ,उपसरपंच अनिल नरवडे, माजी सरपंच अतुल बेंद्रे, गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश बेंद्रे, माजी अध्यक्ष आण्णा बेंद्रे, रामचंद्र दौंडकर माजी चेअरमन उत्तम बेंद्रे, उल्हास जांभळे व्हाइस चेअरमन शामराव झेंडे , तसेच विकासोचे सर्व संचालक मंडळ आंबळे-कळवंतवाडी गावचे आजी माजी पदाधिकारी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते .