वाघोली येथील दत्ता गायकवाड यास दोन वर्षासाठी तर चेतन देवकुळे यास एक वर्षासाठी परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईतांना तडीपार करण्याचे प्रस्ताव दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने सराईतांमध्ये चलबिचल पहावयास मिळत आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस स्टेशनहद्दीतील वाघोली, केसनंद, चंदननगर भागात दहशत निर्माण करून, नागरिकांना वारंवार त्रास देणाऱ्या तसेच घातक शस्त्र वापरून दहशत निर्माण करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. त्यांच्यावर कायद्याचा वाचक बसावा या उद्देशाने लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पथकाने दत्ता गायकवाड व चेतन देवकुळे यांच्यावर दाखल गुन्ह्याचा अभिलेख तपासून तपासून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्याकडे पाठवला होता. उपायुक्त पवार यांनी सदर प्रस्ताव मंजूर करून दोघांना तडीपार केले आहे.