मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते, तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोरोना काळात केलेल्या कार्याचे तसेच त्यांच्या आर्थिक शिस्तीचं 'कॅग' रिपोर्टमध्ये कौतुक करण्यात आले आहे. 

तत्कालिन वित्तमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याला २०२०-२०२१मध्ये राजकोषीय तूट तीन टक्क्यांखाली म्हणजे २.६९ टक्क्यांपर्यंत आणण्यात राज्याला यश मिळाल्याचे अहवाल नमूद करण्यात आले आहे.

विधानसभेत आज 'कॅग'चा अहवाल मांडण्यात आला. या अहवालानुसार राज्यावरचे कर्ज २०१६ - १७ मध्ये चार लाख कोटी एवढे होते. ते आता पाच लाख ४८ हजार १७६ कोटी झाल्याचे म्हटले आहे.अहवालामध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात राबविलेल्या आर्थिक शिस्तीचे कौतुक केले आहे.