परभणी दि.25 : जिल्ह्याकरीता परभणी शहरातील दर्गा रोडवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयाची आज जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्त्री रुग्णालय उभारण्याच्या कामात कोणत्या अडचणी येत आहेत याची संबंधीतांकडून माहिती घेतली. स्त्री रुग्णालयाचे आतील सर्व कामे तात्काळ पुर्ण करुन बाहेरची संरक्षण भिंतीचे कामे करावीत. तसेच इमारतीचे बांधकाम दर्जेदार करुन वेळेत पुर्ण करण्याच्या संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या. तसेच या कामाकरीता लागणारा निधी लवकर उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, प्रशासक डॉ. किशोर सुरवसे, संबंधीत अभियंता आणि कंत्राटदार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.