मुंबई -(प्रतिनिधी)खामगाव येथे भाऊसाहेब तथा स्व. पांडुरंग फुंडकर यांचे टेक्सटाईल पार्कच स्वप्न सरकारने प्रत्यक्षात साकार करावं, ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले. आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात वि.स. पागे संसदीय प्रकाशन केंद्राच्या वतीने महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

आयोजित स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या जीवनकार्य व त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित "भूमिपुत्र" या स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्यातील भाषणात विरोधी पक्षनेते दानवे हे बोलत होते. 

विरोधी पक्षनेते दानवे यांनी केलेल्या टेक्स्टाईल पार्क उभारणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत त्यांच्या भाषणात पुंडकर यांच्या टेक्स्टाईल पार्क उभारणी बाबत सरकार नक्की विचार करेल अशी ग्वाही दिली.

   भाऊसाहेब यांनी खामगाव ते आमगाव शेतकरी दिंडी काढली होती त्याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष होते. माजी कृषीमंत्री स्व.पांडुरंग फुंडकर हे भाजपचे वरिष्ठ नेते होते तरी सर्व पक्षात त्यांचा आदर व सन्मान होता. गेले सात वर्षे त्यांनी विधिमंडळ असेल किंवा सत्ताधारी पक्षात त्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. 

  त्यावेळी सर्व भाजपचा विरोध करत असताना भाऊसाहेब यांनी नेटाने पक्षाच काम केलं. सर्व जबाबदाऱ्या उत्तम पार पाडल्या. त्यांचं सर्व ठिकाणी उत्तम समनव्य होतं असे दानवे म्हणाले. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते राम नाईक विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार,विधानसभेचे

उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सुनीताताई फुंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.