विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर थोरे यांचा निरोप समारंभ संपन्न...
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
आज दि.१५ ऑगस्ट रोजी पैठण येथे कार्यरत असलेले विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर थोरे यांचा बिडकिन ग्रामपंचायत कार्यालय येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.बिडकिन ग्रामपंचायत कार्यालय येथे १९९३ साली ते ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.कार्यरत असताना ग्रामपंचायत कार्यालय ची इमारत,मंगल कार्यालय,गाळे आदींसह भरपुर कामे त्यांनी आपल्या कार्यकाळात केली.ग्रामपंचायत कार्यालय येथे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर थोरे यांना निरोप समारंभाचे आयोजन करत निरोप देत सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष किसन तोतला ग्रामसेवक अरुण गोर्डे, माजी सरपंच अशोक धर्मे, युवासेना तालुकाप्रमुख विकास गोर्डे, अमोल वंजारे, किरण गुजर, पत्रकार हसन चाऊस,नंदु वैद्य,उत्तम धर्मे,आदींसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व अधिकारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती..