मुंबई दि. 25 - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र् राज्य कार्यकारीणीची निवडणूक रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत पुणे येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. रिपाइं च्या राज्य कार्यकरिणी च्या अध्यक्ष पदी राजाभाऊ सरवदे ( सोलापूर ) यांची निवड करण्यात आली. राज्य कार्याध्यक्ष पदी बाबुराव कदम ( औरंगाबाद) राज्य सरचिटणीस पदी गौतम सोनवणे ( मुंबई) राज्य संघटन सचिव पदी परशुराम वाडेकर (पुणे) राज्य संघटक पदी सुधाकर तायडे ( अकोला ) राज्य उपाध्यक्ष पदी अण्णासाहेब रोकडे (कल्याण ) या 6 जणांची निवड करण्यात आली अशी अधिकृत घोषणा रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी काम पाहिले यावेळी माजी आमदार सुमंत राव गायकवाड उपस्थित होते.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या रिपाइं च्या राज्य कार्यकारिणीच्या निवडणूकीला राज्य भरातून सर्व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. रिपाइं च्या राज्य कमिटी मध्ये एकूण 54 जणांची निवड होणार असून 18 निमंत्रित सदस्यायाची ही नियुक्ती करण्यात येणार आहे अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी केली.
रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारीणी मध्ये महाराष्ट्रतील सर्व प्रदेशांना समान संधी देण्यात येत असून सर्व जाती धर्मीयांना या कार्यकरिण मध्ये समान संधी देण्यात येणार आहे.
रिपाइंची राज्य कार्यकारीणी चा कालावधी 5 वर्षांचा असून दर 5 वर्षांनी कार्यकरिणीच्या निवडणुका घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याकडे रिपाइं चे लक्ष राहील असे ना.रामदास आठवले म्हणाले.