वैजापूर
येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व वैजापूर शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी ,गणेश महासंघ अध्यक्ष काशीनाथ शेठ गायकवाड यांची मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेंड अँड कॉमर्स च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी बुधवार(ता,२४)रोजी निवड झाली ,अध्यक्षपदी आदेशपालसिंह छाबडा तर महासचिवपदी जगन्नाथ काळे यांची निवड करण्यात आली ,काशीनाथ शेठ गायकवाड यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते व गणेश महासंघ सचिव धोंडिरामसिंह राजपूत यांनी त्यांचे अभिनंदन केले,मराठवाड्यातील व्यापारी बांधवांच्या आडी अडचणी जाणून घेऊन त्या शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असल्याचे काशीनाथ शेठ गायकवाड म्हणाले,ते पुढे म्हणाले की,मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेंड अँड कॉमर्स चे आम्ही सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी मराठवाडा प्रदेशातील व्यापारी बांधवांच्या पाठीशी आहोत व त्यांच्या समस्या निश्चितपणे सोडऊ ,या समयी व्यापारी संघाचे विनोद गायकवाड,वैजापूर किराणा असोसिएशनचे प्रकाश बोथरा,गणेश अनर्थे,सिद्धेश गायकवाड व पी,एम,ठाकूर उपस्थित होते.