आष्टी (प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या निमित्ताने आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची शांतता कमिटी बैठक पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली येथील पोलीस ठाण्यात आज दि.गुरुवारी दि.25 ऑगस्ट रोजी घेण्यात आली गणेश मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी यांच्या अडीअडचणी विचारून जाणून घेण्यात आल्या यावेळी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी येथील खेळीमेळीचे वातावरण पाहून आनंद वाटला पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांचे अभिनंदन केले तसेच गणेश उत्सव राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा स्वातंत्र्य मध्ये गणेश उत्सवाला अन्यय साधारण महत्व आहे.गणेश उत्सावाच्या माध्यमातून अत्याचार,बाल विवाह, थांबेल समाज प्रबोधन होईल असे देखावे साजर करावेत पोलिसांकडून जास्तीत सहकार्य मंडळांना मिळेल, धुमधडाक्यात जोशात गणेश उत्सव साजरा करा पण सय्यम तेवढाच ठेवा विघ्नहर्त्या चा उत्सव निर्विघ्न साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुन पोलिसांना सर्वांना सहकार्य करुन कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस,नायब तहसिलदार शारदा दळवी,बबन झांबरे,विजय गोल्हार,सतिष शिंदे, नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे, आजिनाथ गिते,दसपुते उपस्थित होते.पुढे बोलताना पोलिस अधीक्षक ठाकूर म्हणाले की गणेश उत्सवाचा बंदोबस्त करणे आम्हाला आवडते 2 वर्ष आनंद वाटला नाही गणेश उत्सव साजरा करण्यास वेगळाच आनंद आम्हाला मिळतो डिजे आवाज कमी करायला लावणे नागरीक आनंद घेतात आम्हाला पण आवडते, रहदारीला अडचण होणार नाही याची काळजी मंडळाने घ्यावी, सामाजिक, धार्मिक वातावरण चांगले आहे,तरी बेसावध राहू नका सोशल मीडिया स्ट्रॉग आहे,तरुणांना भडकवले जाईल आक्षेपार्ह मॅसेज फॉरवर्ड करु नका,देखावे सामाजिक प्रबोधन व्हावे कुणाचीही भावना दुखवू नये,वर्गणी मागताना विचार करावा,स्वईच्छेने वर्गणी घ्या परवान्यासाठी पोलिसांकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळेल, परवान्यासाठी फी लागणार नाही,हवामान अंदाज पाऊस जास्त असणार आहे.मंडप वॉटर प्रुप असतील याचा विचार करावा,गणपती बुद्धी ची देवता पत्ते खेळु नका,दारु पिणे विटंबना च आहे.गणेश उत्सव निविघ्न पार पाडावा,सुचनांचे पालन करा,पोलिसानांही सूचना समन्वय राखा, सीसीटीव्ही कॅमेरे लावा, कडेकोट बंदोबस्त ठेवा गणेश उत्साह आनंदात जोशात साजरा करा पण सय्यम तेवढाच ठेवा अशा सूचना पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिल्या यावेळी अशोक साळवे,भारत मुरकुटे, संदिप खाकाळ,अजित घुले,किशोर झरेकर,मुक्ती शफी,सुनिल रेडेकर,कैलास दरेकर,दिपक उंबरकर, ज्ञानेश्‍वर राऊत,शरीफ शेख, यशवंत खंडागळे, अनंत जोशी, नगरसेवक अक्षय धो़ंडे, बापुराव डोके,सरपंच उदमले,जफर शेख,सतिष बनकर, रविंद्र ठाकूर, आदी मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे पोलिस निरीक्षक सलिम चाऊस,पी.एस आय अजित चाटे यांनी आभार मानले.