यवतमाळ :  एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून रोखेसह सोने असा एकूण 50 हजाराचा मुद्देमाल लंपास केला.ही घटना 22 ते 23 ऑगस्ट ला रात्रीच्या सुमारास येथिल मकरंद लेआउट तुळजानगरी परिसरात असलेल्या साई प्रेमा अपार्टमेंट येथे घडली.डॉ. प्रफुल विनोद गिरी (34) रा. मथुरा नगरी आर्णी, असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे आर्णी येथील रहिवासी आहे.साई प्रेमा आपारमेंट मध्ये ते फ्लॅट घेऊन राहतात. मागील आठ दिवसांपासून आर्णी ते यवतमाळ ते दररोज अपडाऊन करीत आहे. अशा स्थितीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात कोणी नसल्याचे संधी साधून डल्ला मारला.यामध्ये फ्लॅटचे कुलूप पुन्हा तोडून हा प्रवेश करीत लॉकर मधील35000 ची रोख व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण 50 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. घटनेनंतर फिर्यादीने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रेसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.