परभणी प्रतिनिधी
दिनांक 22 ऑगस्ट रोजी वडगाव (स्टे) येथे *राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस परभणी रामेश्वर बचाटे* यांनी आपल्या जन्मदिवसा निमित्य आपल्या गावात गावापुढे आदर्श ठेऊन अनोखा उपक्रम राबवला.
सद्याच्या ट्रेंड नुसार जन्मदिवस साजरा करताना जो अनावश्यक खर्च पार्टी किंवा केक वर केला जातो तोच अनावश्यक खर्च आपल्या समाजासाठी व गावासाठी कसा उपयोगी आणता येईल व नवीन पिढी ने आपल्या गावाच्या विकासाठी तो खर्च उपयोगी आणला तर कमी वेळेत गावाचा विकास होईल हा आदर्श ठेवला.
जन्मदिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतेमेचे पूजन करून भगवा झेंड्याचे ध्वजरोहन करून केली.
तसेच गावात बौद्धविहाराकडे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्या ला युवराज बचाटे व रामेश्वर बचाटे यांनी पुष्पहार अर्पण केला.
तसेच गरीब व श्रीमंत असा भेद न करता केंद्रीय प्राथमिक जिल्ह्या परिषद शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
त्याप्रसंगी *आनंदा सामाजिक व सांस्कृतिक संस्था, वडगाव चे संस्थापक अध्यक्ष आनंद वाव्हले* यांनी गावातील नवतरुण मुलांनी आपले जन्मदिवसा दिवशी होणारा अनावश्यक खर्च आपल्या गावातील शाळेसाठी करून पुढील जन्मदिवस साजरे केले तर खूप कमी काळात वडगाव हे आदर्श गाव नावारूपाला येईल अशी अपेक्षा व्यक्त करून रामेश्वर बचाटे याना शुभेच्छा दिल्या.
गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेऊन कुठल्या ही पदाची किंवा सहकार्याची अपेक्षा न ठेवता शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात कार्यरत असणारे रामेश्वर बचाटे यांच्या
या जन्मदिवसा निमित्ताने गावचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते *अमोल बचाटे* यांनी येणाऱ्या 26 जानेवारी प्रजसत्ताक दिनी शालेय प्रथम वर्षात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास सरप्राईज पारितोषिक देण्याची घोषणा केली.
त्या नंतर वडगाव ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण करून मारुती मंदिरा समोर बेलाचे झाड लावून या जन्मदिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच अरुण डाके, उपसरपंच गणपत बचाटे, ग्रामपंचायत सदस्य, भास्कर आबा बचाटे, बाळू काका बचाटे, रावसाहेब बचाटे, माणिक भाऊ बचाटे,अमोल बचाटे, आत्माराम बचाटे, किशन अप्पा बचाटे, बाळासाहेब बचाटे,
युवराज बचाटे, सुमेध वाव्हले, दीपक बचाटे,, छत्रपती बचाटे, पप्पू बचाटे, शाम देवकते, वैभव वाव्हले, दीपक वाव्हळे, राजेश केंदले, कल्याण चव्हाण,माऊली जाधव, गणेश सोंगेवाड, बालाजी सोंगेवाड, संतोष शिनगारे उपस्थित होते.