रायपूर निंबाळे शिवारातले शेतकऱ्यांची शेतातील मका हे पीक काढण्यासाठी आलेले असताना रात्रीच्या वेळेस डुकरांनी केले नुकसान. 

एकीकडे सातच्या पावसाने पीक खराब होत असताना शेतकऱ्यांपुढे नवी संकट आले आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील रायपूर निंबाळे शिवारातील शेतकरी प्रवीण कोल्हे यांनी सहा एकरात मका पिकाची लागवड केली आहे. 

 मका पीक काढण्यासाठी आलेल्या असताना रात्रीच्या वेळेस डुकरांचा कळप मका पिकात घुसून पिकांची नास करीत आहे. यामुळे प्रवीण कोल्हे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सततच्या डुकरांच्या वावराने परिसरातील शेतकरी त्रस्त आहे. या डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.