अखेर राज्य सरकारची शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय
आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार
जून ते ऑक्टोंबर २०२२ कालावधीतील अतिवृष्टी ,पूर , नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली होती किमान २ वेळच्या नुकसानीच्या मदतीची मागणी
दिनांक 23 ऑगस्ट २०२२ गडचिरोली
राज्यात आलेल्या जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील अतिवृष्टी, पूर, वादळ वारा ,नैसर्गिक आपत्ती, यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले अशा नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची मदत यापूर्वीच्या देण्यात येणाऱ्या मदतीपेक्षा दुप्पट करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्याबद्दल आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
राज्य सरकारने याबाबत दिनांक २२ ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून मदती संदर्भात संबंधित विभागाला आदेश दिलेले आहे
या मदतीमध्ये जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी यापूर्वी दर हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत होती ती आता १३ हजार ६०० रुपये करण्यात आली आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी दर हेक्टरी १३ हजार ५०० होती ती आता २७ हजार रुपये करण्यात आली आहे. बहुवार्षिक पिकांच्या मदतीसाठी १८ हजार रुपये होती ती आता ३६ हजार करण्यात आली आहे.
राज्यात ३ वेळा महापुराची स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये कमीत कमी दोन नुकसानीच्या विचार करण्यात यावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली होती या मदतीमुळे शेतकऱ्यांना दुपट मदत मिळणार असून त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आहे.