अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्तीप्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.
राज्यात जुलै, 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि. 10-08-2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र.सीएलएस-2022/प्र.क्र.253/म-3, दि. 22-08-2022 अन्वये जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना98 कोटी 58 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनापासून गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत होती.
अखेर सरकारने तीन जिल्ह्यांतील बाधित शेतकयांसाठी मदत देण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकयांना सर्वाधिक 92 कोटी 99 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी रू. 13,600/- प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत
बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत रू. 27,000/- प्रति हेक्टर, मदतीचे वाढीव दर 3 हेक्टरच्या मर्यादेत
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत रू. 36,000/- प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत