वैजापूर : शैलेंद्र खैरमोडे 

विनायक सहकारी साखर कारखाना सुरू होवा ही शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून अपेक्षा आहे पण गेल्या काही वर्षांपासून हा साखर कारखाना वीस बावीस वर्षापासून बंद असल्याकारणाने तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे हा कारखाना राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असून बँकेने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे हा कारखाना जय हिंद शुगर मिल यांना पंचवीस वर्षासाठी भाडे तत्त्वावर बँकेने दिला असून हा कारखाना हा शासनाने विशेष पॅकेज देऊन लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी सहकार मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनात विविध मागण्यासह तत्कालीन सहकार मंत्री विनायकराव पाटील यांनी या भागात सिंचन प्रकल्प सुरू करून ,विनायक सहकारी साखर कारखाना सुरू केला.पण काही दिवसांनी सत्ताधारी लोकांनाही कारखाना चालू ठेवला पण कामगारांच्या अडमुठे धोरणामुळे आणि उसाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे कारखाना अवसायनात गेला.व करखाण्यावर प्रशासक नेमण्यात आला.तालुक्यात १५वर्षांपूर्वी नांदूर मदमेश्वर ,शिवना टाकली,बोर दहेगाव मध्यम प्रकल्प,शिवना टाकली,मन्याड, यासरखे प्रकल्प पूर्णत्वास गेले आणि तालुक्यातील ५०हजार एकर जमीन सद्या ओलिताखाली आली.आणि त्यामुळे वैजापूर तालुक्यातील उसाचे क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दरवर्षी १०लाख टन ऊस तालुक्यातील शेतकरी उत्पादन करत आहे.परंतु तालुक्यातील हक्काचा विनायक सहकारी कारखाना बंद असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने शेतकऱ्यांची लूट करत आहे.आणि ऊस तोडणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी२९हजार रुपये द्यावे लागत आहे 

 या निवेदनावर विनायक.त्यामुळे उसाचे उत्पन्न घेण्यास वैजापूर तालुक्यातील शेतकरी उदासीन दिसत आहे.

आणि आता शासनाने विविध बंद पडलेले साखर कारखाने भाडे तत्वावर दिलेले आहेत .आणि यात विनायक सहकारी साखर कारखाना पण २४वर्ष भाडे तत्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यामुळे शासनाच्या निर्णयाप्रमाणे बंद पडलेला विनायक सहकारी साखर कारखाना गतीने काम करून लवकर चालु केल्यास ,वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना सुरू होईल व त्यावर अवलंबून असलेल्या मजूर, ऊस उत्पादक, कर्मचारी,याना याचा लाभ होणार आहे.त्यामुले आपण जिल्ह्याचे मराठवाड्याचे भूमिपुत्र आहात व आपल्याला सहकार क्षेत्राची जाणीव आहे.त्यामुळे आपण सहकार मंत्री असल्याने हा विनायक सहकारी साखर खरखाना लवकरात लवर सुरू करावा अशी मागणी सर्व कारखाना सभासद,व उत्पादक शेतकरी वैजापूर तालुका यांच्या वतीने सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 या निवेदनावर विनायक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच शेतकरी नेते चंद्रकांत कटारे शिव क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष सुनील बोडके शिव क्रांती सेना प्रदेश कार्याध्यक्ष सोमनाथ मगर, अरुण मलिक यांनी मागणी निवेदनाद्वारे केली व उस, उत्पादक शेतकरी व सभासदांनी केली.