यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवरच महिलेची प्रसूती झाल्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले आहे. शुभांगी सुदर्शन हापसे (रा. टाकळी), असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कुणीच नसल्याने गेटवरच महिलेची प्रसूती झाले. यात जन्मलेल्या नवजात शिशूचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून कोण कर्मचारी उपस्थित होते. कोण दौऱ्यावर होते, सर्वच रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे. यात जे कर्मचारी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी दिली.