जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा- मा.आमदार डॉ नामदेवराव उसेंडी

कोनसरी, आष्टी, चदनखेडी, चौडम्पल्ली, सिंघनपल्ली, कुनघाडा माल, चपराळा गावातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी.

जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने वारंवार पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मध्यप्रदेश व गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे अनेक गावांत पूरपरिस्थिती तयार झाली. जिल्यातील अनेक घरांची पडझड झाली. व घरांमध्ये पाणी शिरले. व शेती पाण्याखाली सापडल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी दुबार - तिबार पेरणी व रोवणी केली. परंतु पुरामुळे सर्व पिक सडून गेली. 

 माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ नामदेवराव उसेंडी यांनी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, आष्टी, चदनखेडी, चौडम्पल्ली, सिंघनपल्ली, कुनघाडा माल, चपराळा गावातील पूरग्रस्त भागाची काल दिनांक २०-आगस्ट ला पाहणी केली. यावेळी जिल्हाकोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, न.प. चामोर्शी नगरसेवक सुमित तुरे, संजय पंदीलवार, माजी.प.स सदस्य शंकर आकरेट्टीवार, महिला जिल्ह्याध्यक्ष तथा माजी जी.प सदस्य रुपालीताई पंदीलवार, उपाध्यक्ष अनिल कोठारे, तुकाराम तोरे, रतनजी आकेवार, अरुनजी बंडावार, सरपंच ग्रा.प कोनसरी श्रीकांत पावडे, बालाजी पत्रोजवार, सुरेश करपाते, ग्रा.प सदस्य रामदास करपाते, सुकदेव नैताम, अनिलजी सादमवार, पंकज मंथनवार, किशोर मंथनवार, तिरुपती नानमेंवार, मोतीराम मडावी, वासुदेव बोटावार, सुभाष आत्राम, सुनील शेडमाके, संदीप पेंदाम, कपिल वरगलवार, सुभाष कंनाके, दिनेश आत्राम, मारोती गेडाम, सखाराम कंनाके, रुपेश नैताम, विजय कंनाके, अशोक कंनाके, जैराम कंनाके, मारोती कंनाके, गणपती कंनाके, गणपती कंनाके, ग्रा.प सदस्य मिथुन कंनाके, लक्ष्मण गावडे, भुजंगराव शेडमाके, साईनाथ गुरनुले, किर्तीमान शेडमाके, बाबुराव टेकुलवार,इंदरसाय आत्राम, मार्कंडेय संगमवार, रमेश बोटावार, संतोष गुरनुले, अभिमान टेकाम, सुरेश आत्राम, नारायण गुरनुले, मोरेश्वर गुरनुले, मारोती संगमवार, सुरेश कोकिरवार, चौडम्पल्ली ग्रा.प सरपंच दयानंद कोकिरवार, आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

          पुरामुळे शेतीतील मातीच वाहून गेल्यामुळे शेतजमीन खरडल्या गेली आहे. एकीकडे आर्थिक नुकसान आणि दुसरीकडे उध्वस्त शेतीचे संकट आणि सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांवर तिहेरी संकट ओढवले आहे. 

तुटपुंज्या मदतीमुळे शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही. शेतकऱ्याला आधार देण्यासाठी एकरी कमीत कमी २५,००० रुपयांची मदत मिळायला हवी. तसेच खरडून गेलेल्या जमिनीचे पुन्हा पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत सरकारने द्यावी अशी मागणी माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ नामदेवराव उसेंडी यांनी केली आहे.