बीड दि.20 (प्रतिनिधी) -अरे दिवानो मुझे पहचानो मै हूँ डॉन .... या गाण्याने डॉ. योगेश क्षीरसागर यांनी नगरपालिका निवडणूकीचे रणशिंग फुंकले.एक रुपयाही वर्गणी जमा न करता स्वराज्य सार्वजनिक दहिहंडी उत्सव साजरा केला. हा आदर्श शहरातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाने घ्यावा असे आवाहन डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केले ते दहीहंडी उत्सव प्रसंगी काळा हनुमान ठाणा येथे बोलत होते.

 यावेळी मा.उपनगराध्यक्ष अमृत सारडा, मा.नगरसेवक प्रेम चांदणे, शुभम धुत, अ‍ॅड.महेश धांडे, अमर जाधव, आदित्य पवार, निशांत जाधव, निखिल जाधव, उमेश बांगर, आमेर सिद्दीकी, अमर विद्यागर, इकबाल भाऊ, साजेद जागीरदार विशाल मोरे, रामेश्वर चांदणे, कल्याण ताकतोडे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की,बीड शहरात दोन अडीच वर्षात कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे मानवी जीवन अस्ताव्यस्त झाले होते. तरुणाईला आपला उत्साह दाखवण्यासाठी जागा उरली नव्हती. अशातच दहीहंडी, वेगवेगळे जयंती उत्सव, सणउत्सव, यावर विरजण पडले होते. मात्र आता बीडकरांच्या तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला आहे,यापुढे बीडकरासाठी असेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी पुढाकार घेऊ .आम्ही सातत्याने बीडमध्ये असेच सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन तरुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो,आण्णासाहेब आणि अध्यक्ष साहेब यांनीही सतत अशा कार्यक्रमांना पुढाकार घेऊन प्रोत्साहन दिले आहे,असेही ते म्हणाले.

चौकट

प्रेम वाघमारेला 5001चे बक्षीस 

याप्रसंगी ऑर्केस्ट्रातील एका महिला कलाकाराने बीडच्या तरुणाईला आवाहन केले.हे आवाहन प्रेम वाघमारे या तरुणाने लिलया पेलले.स्टेजवर दंड बैठका,पुल्सअप काढले. त्यामुळे डॉ. यौगेश क्षीरसागर यांनी 5001 रूपये बक्षीस जाहीर केले.या प्रसंगी तरुण-तरुणी,नागरिक महिला मोठ्या संख्येने दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते.