बिडकिन येथील दहीहंडी फोडण्याचा मान सुजित भाऊ जाधव दहीहंडी पथकाच्या वतीने ६ थर लावुन पार पाडला..

दहीहंडी उत्सव 2022 चा मानकरी राकेश गाढे...

बिडकिन प्रतिनिधी:- आज दि.१९ रोजी पैठण तालुक्यातील बिडकिन येथे बाबासाहेब टेके (आण्णा) मित्र मंडळ,शिवक्रांती मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सभापती विलास बापु भुमरे, चेअरमन बबन ठाणगे,माजी सभापती कृष्णा चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या हस्ते करुन दहीहंडी उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.यावेळी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न ५ पथकाच्या वतीने करण्यात आला मात्र सुजित भाऊ जाधव दहीहंडी पथकाच्या वतीने ६ थर लावुन दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला आहे.सुजित जाधव दहीहंडी पथकाचा गोविंदा राकेश गाढे हा मानकरी ठरला आहे.यावेळी प्रथम पारितोषिक ३१०००/- रू व ट्रॉफी देऊन सुजित भाऊ जाधव दहीहंडी पथकाला सन्मानित करण्यात आले.

दहीहंडी उत्सवाला महाराष्ट्रातील नामांकित तीन कलाकारांचा लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य लतिफ कुरेशी, युवासेना जिल्हा प्रमुख काकासाहेब टेके, नगरसेवक अशोक टेके,नगरसेवक मधुकर सोकटकर, दिंगबर कोथिंबीरे,ॲड.सतिष हाडे, राहुल काळे,सागर फरताळे,सुदाम अपशिंदे, आकाश वंजारे,सूभाष जाधव, सुनिल धुत, रामेश्वर जाधव, प्रल्हाद मोगल,संतोष मोगल,पिराजी कळसकर,आदींसह बिडकिन व परिसरातील सर्व खेड्यातील प्रतिष्ठित नागरिक व युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होता.दहीहंडी उत्सवात उत्कृष्ट सुत्रसंचालन म्हणून जगदिश अंबिलवादे यांनी काम पाहिले तर आभार प्रदर्शन काकासाहेब टेके यांनी केले.

यावेळी बाबासाहेब टेके मित्र मंडळ व शिवक्रांती मित्र मंडळ यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. पैठण उपविभागीय अधिकारी डॉ विशाल नेहुल, सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे, जगदिश मोरे,पोलिस कर्मचारी बनगे,नाडे,जोरले,वसावे,माळी, आदींसह मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ‌.