चाकण येथील लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर आणि आर्ट वर्ल्ड ड्रॉईंग क्लास चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनवण्याचे मोफत प्रशिक्षण चाकण येथे संपन्न झाले. यावेळी १०० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण वर्गात सहभाग घेतला होता. आर्ट वर्ल्ड ड्रॉईंग क्लासच्या कला शिक्षिका सौ. निता शेवकरी यांनी मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

सध्या प्रदुषणामूळे आरोग्याच्या व पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामूळे गणेशोत्सवात शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती बसविल्यास प्रदुषणाला आळा बसेल. पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती लवकर पाण्यात विरघळत नाही त्यामूळे अनेक समस्या उद्भवतात म्हणून श्यक्यतो पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन नीता शेवकरी यांनी केले.

यावेळी लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरच्या जयश्रीताई गोरे, कलाविष्कार मंच चाकणचे नारायण करपे, सुशील शेवकरी, विशाल बारवकर, अष्टविनायक मित्र मंडळाचे आशिष शेवकरी आदी उपस्थित होते. उपस्थितांचा या स्तुत्य उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला.