वैजापूर
आज समाज अस्थिर व भरकटलेल्या अवस्थेतआहे समाजात, कुटुंबात,मनात,मोठी अशांती आहे,याला जबाबदार घटक म्हणजे बदलती परिस्थिती, बदलती मानसिकता ,मोबाईलचा अतिरिक्त वापर,व इलेक्ट्रॉनिक माध्यमे व त्यावरील अफवा तसेच सोसिएल मेडिया व दूरदर्शन वरील समाज प्रवाहा विरुद्ध वागणारी माणसे जबाबदार आहेत हे सर्व थांबण्यासाठी समाजातील सामाजिक कार्यकर्ते,शासन व प्रशासन यांनी सर्वंकष प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे,असे प्रतिपादन शांतता समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांनी येथील सुशीलाबाई कदम अध्यापक महाविद्यालयात गुरुवार रोजी केले, ते समाजात शांततेसाठी काम करणाऱ्या समाज कार्यकर्त्याची भूमीका व कार्य,कर्तृत्व या विषयावर या विद्यालयातील छात्र अध्यापक व अध्यापिका यांच्या साठी आयोजित व्याख्यांन कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,शिक्षकांनी शालेय अभ्यासक्रम बरोबर विद्यार्थ्यांना सामाजिक शांततेसाठी पार पाडायची कर्तव्ये या बाबत संस्कार बिंबविले तर नवी पिढी समाजात शांततेसाठी प्रयत्न करू शकते,श्री राजपूत यांनी संचारबंदी, जमाव बंदी,३७(१),३७(२-३),या कलमं बाबत ही माहिती दिली.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ,अशोक ठोसर यांनी केले, संचलन प्रिती चांदणे यांनी केले तर आभार विरपत्नी श्रीमती आरती थोरात यांनी मानले,कु,सय्यद,व सय्यद जाहेद यांनी श्री राजपूत यांची मुलाखत घेतली या प्रसंगी प्रथम व द्वितीय वर्ष चे छात्रअध्यापक व अध्यापिका, तसेच प्रा,श्रीमती पी,गुजर, प्रा,श्रीमती, के,एस, गायकवाड ,प्रा,गायकवाड,प्रा,गुजर यांची उपस्थिती होती.