सेलगावं येथे महा अंनिस चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

बदनापूर : ता.1/10/2022 शनिवार सेलगाव जिल्हा परिषद प्रशाला येथे आम्ही नवदुर्गा प्रबोधन चळवळीच्या वतीने नवरात्रीत्सवाचे नऊ उपक्रमांतर्गत वैज्ञानिक दृष्टिकोन विषयाच्या अनुषंगाने सर्पविज्ञान,चमत्कार सादरीकरण आणि मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये बुवाबाजी संघर्ष जिल्हा कार्यवाह रंगनाथ खरात यांनी पाण्यावर दिवा पेटवणे, नारियल पेटवणे,नारियल मधून करणी भानामती काढणे,जिभेवर जळता कपूर ठेवणे, असे अनेक चमत्कार करून दाखविले.तसेच त्यामागील विज्ञान समजून सांगितले. 

        दिलीप शिखरे संवेदना प्रकल्प समन्वयक जालना यांनी सामान्य मानसिक आजारांची माहिती सांगितली तसेच आजही समाजात मानसिक आजारांना अंधश्रद्धा समजून दुर्लक्षित केले जाते व वैद्यकीय उपचारापासून वंचित ठेवले जाते. मानसिक आजारचे लवकर निदान आणि योग्य उपचार घेतले तर मानसिक आजार बरे होतात. मागील 1 वर्षापासून जालना जिल्ह्यात संवेदना प्रकल्पाद्वारे शासकीय रुग्णालयात मनोरुग्णांना मोफत औषध उपचार सुरू आहेत. त्यामुळे अंधश्रध्देला बळी पडून अश्या व्यक्तीवर कोणतेही अघोरी उपाय करू नये. असे सांगितले तर सर्पमित्र अजय शिंदे यांनी पोस्टर द्वारे भारतात आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सापाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. शिक्षिका मनीषा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जगत घुगे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.यावेळी शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक श्याम देशमुख, श्रीमती मनीषा पाटील , जोत्स्ना बिडकर, अरविंद खरात,योगेश मोरे,राजेंद्र कायंदे, जगत घुगे,सुनीता पडूळ, मनीषा बोडले, जोशी सर,मूर्तरकर सर सीमा कुलकर्णी वैशाली राऊत आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.