पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा किसान संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी पाटोदा तहसिल कार्यालयावर मोर्चा गुरुवार दि 18/ 08 / 2022 रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन ते पाटोदा तहसिल कार्यालयावर मोर्चा खालील मागण्यासाठी काढण्यात आला किसान संघर्ष समिती यांच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या 

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

नियमीतपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५००००=०० रुपये प्रोत्साहन अनुदान त्वरीत द्यावे. २) सन २०१९, २०२०, २०२०-२०२१ खरीप, रब्बी पीक विमा शेतकऱ्यांच्या तक्रारीचे त्वरीत निवारण करावे.

३) पीक कापणी प्रयोग रद्द करून बीड पॅटर्न प्रमाणे पीक विमा द्यावा.

४) मोफत धान्य पुरवठा न करता कष्टाच्या मोबदल्यात धान्य पुरवठा करावा.५) राष्ट्रीयकृत बँकेने कर्जपुरवठा शासनाच्या लक्षांका प्रमाणे कर्ज पुरवठा करावा.६) अन्नधान्य व कृषी यंत्रा वरील जी.एस.टी कर रद्द करावा.७) सरकार धान्य खरेदी वरील दर १५०० रु. प्रती विक्टल प्रमाणे द्यावा. ८) रासायनिक, सेंद्रीय खते भेसळ बंद करण्यासाठी खत प्रशिक्षण शेतकऱ्यांना शासनामार्फत द्यावे.

९) गाव निहाय पाऊस मोजण्याची व्यवस्था करावी.१०) पैसे वारी पध्दत अधुनिक तंत्रज्ञानावर काढा या मागण्याठी किसान संघर्ष समिती यांच्या वतीने तहसील वर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख,इकबाल पेंटर, चक्रपाणी जाधव, नगरसेवक उमर चाऊस, काँग्रेस नेते इमरान शेख, राम गोंदकर, नरहरी पवळ,भागवत नागरे, राजाभाऊ जायभाय, आबा चौरे, बाळासाहेब ढवळे यांच्यासह पाटोदा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते