कन्नड (प्रमोद ढोले): कन्नड शहरात प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सेवा भारती देवगिरी प्रांताच्या वतीने ३८ वे रुग्ण सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेवा केंद्राचे उद्घाटन साने गुरुजी विद्यालयाचे अध्यक्ष तथा रोटरी क्लब शाखा कन्नडचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील व सिल्लोड जिल्हा संघचालक शेखर मांडे, देवगिरी प्रांत सेवा भारतीचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांतजी शिरपेवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

​या प्रसंगी डॉ. मिलिंद पाटील यांनी कन्नड शहरात अशा रुग्ण सेवा केंद्राची आवश्यकता आहे, त्यातून गरजूंनी या सेवा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत शिरपेवार यांनी देवगिरी प्रांत सेवा भारतीच्या विविध उपक्रमांची माहिती विस्तृत स्वरूपात सांगितली. आपले जीवन फक्त स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी नसून समस्त मानव जातीसाठी आहे, हे न विसरण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केले.

​या प्रसंगी सेवा भारती देवगिरी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र प्रकल्प प्रमुख शिरीषजी काळे, कार्यालयीन सचिव श्रीधरजी प्रयाग, विजय वाणी, राजू शर्मा, हरिश महाले, मनोज शर्मा, भाग्यलक्ष्मी शर्मा, कन्नड रुग्ण सेवा केंद्राचे प्रमुख शशिन जाधव, केंद्र सहप्रमुख मयुर राठोड, प्रमोद ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद ढोले यांनी केले तर आभार प्रदर्शन मयुर राठोड यांनी केले.

​उपलब्ध साहित्य (अल्प दरात):

निब्युलायझर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, हॉस्पीटल बेड, व्हीलचेअर, वॉकर, एअर बेड, वॉटर बेड, सलाईन स्टँड, कमोड चेअर इत्यादी साहित्य अल्प दरात सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. गरजूंनी जरूर लाभ घ्यावा.

​संपर्क:

​शशिन जाधव (केंद्र प्रमुख)

​मयुर राठोड (केंद्र सहप्रमुख)