गडचिरोली येथे कारगिल स्मारकाचे लोकार्पण संपन्न...

 कारगील चौक स्मारक सदैव विरजवानांच्या बलिदानाचे स्मरण करून देत राहील - ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी

गडचिरोली (प्रतिनिधी)- कारगिल युद्धात प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांचे स्मरण करून देणारे कारगिल स्मारक आणि गडचिरोलीचे उदय धकाते यांचे व आपल्या जिल्ह्यातील लोकांचे भारतीय सैनिकांप्रति असलेले प्रेम - श्रद्धाभाव पाहुन मी सद्गदित झालो आहे. कारगिल युद्धाचे हे स्मारक या भागातील जनतेला सदैव प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन या युद्धात सेवा देणारे सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी यांनी येथे केले.

    नगरपरिषद गडचिरोली यांच्या वतीने कारगिल चौकाचे सौंदर्यीकरण उदय धकाते यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

 या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कारगिल स्मारकाचे उद्घाटक खासदार अशोक नेते यांचे हस्ते झाले.

 याप्रसंगी ते बोलत होते. अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी होते. विशेष अतिथी म्हणून भारतीय सेनेतील सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी यांना कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ च्या वतीने विशेष निमंत्रित करण्यात आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.प्रणिल गिल्डा, माजी नगराध्यक्ष सौ. योगिता पिपरे, प्रमोद पिपरे,अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाप्रमुख डॉ. शिवनाथजी कुंभारे,कारगिल स्मारक चौकाचे अध्यक्ष उदय धकाते, मुख्याधिकारी विशाल वाघ, प्रशासक दर्शन भीमणे,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, नरेंद्र चन्नावार, मोबीन सय्यद, सुनील देशमुख, सुचिता उदय धकाते, निलिमा देशमुख,नदीम शेख, शंकर नैताम, डॉ. बिडकर, सुनील बावणे, गणवेनवार,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले. नगर परिषदेच्या वतीने ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच कारगिल स्मारक चौकाचे अध्यक्ष उदय धकाते यांनीही ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी यांचा मानवस्त्र देऊन गौरव केला तर सौ. सुजाता कुलकर्णी यांचाही साडीचोळी देऊन सौ. सुचिता धकाते यांनी सत्कार केला. ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी यांचा परिचय बंडोपंत बोढेकर यांनी करून दिला. खा. नेते आणि आ. डॉ. होळी यांनी नगरपरिषदेच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि हे स्मारक शहरातील मानाचे स्थान ठरले आहे असे ,मत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बोढेकर यांनी केले. कार्यक्रमास नगर परिषदेचे सर्व कर्मचारी तसेच शहरातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप माणुसमारे,राज पंदीलवार, तुषार दूधबळे,महादेव कांबळे,बाळु मोटघरे

महेश गेडाम,रुपेश सलामे, विवेक बैस,बबलू कटारे,राजेश डोंगरे,महेंद्र मसराम (मोगली),विजय सुरपाम,राज डोंगरे अएफाज मंसुरी,अजय सुरपाम

आकाश कुळमेथे,विवेक वाकडे, साहिल गोवर्धन,वैभव रामटेके,अनिकेत बांबोळे

ताजीसा कोडापे,रोहीत आत्राम,साहिल शेडमाके 

अंकुश बारसागडे,यश कुळमेथे,अजय मेश्राम यांनी अथक परिश्रम केलं