सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोयगाव शहरात जनसंवाद पदयात्रा व भव्य जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला. 

  विरोधकांकडे माझ्या विरोधात बोलण्यासाठी कुठलाच मुद्दा नसल्याने ते खोटे नाटे आरोप करून केवळ बदनामी करत आहे. 

  मतदारसंघात शासनाच्या योजना व विकासकामे करताना गावांतर्गत रस्ते, सिंचन शिक्षण - आरोग्य, शेतकऱ्यांच्या मालाच्या सुरक्षेसाठी शीतगृह, रोजगार निर्मित उद्योग व पाणीपुरवठा आदी विकास योजनांच्या माध्यमातून सुरू असलेली कामे तसेच मतदारांशी माझी जुळलेली नाळ, त्यांच्याशी असलेले अतुट नाते आणि प्रगाढ़ जनसंपर्काच्या बळावर मतदारांची मने जिंकलेली आहे.

येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे यावेळी आव्हान केले याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.