चाकण एम.आय.डी.सी. परिसरात मोटार सायकल चोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला महाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी महेश भगवान गिरी ( वय २२ वर्षे रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे ) या चोरट्यास अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील मोटार सायकल चोरीवर आळा घालण्याकरिता गुन्हयांचे क्राइम मैपिंग करुन, नाकाबंदी व पेट्रोलिंग करुन गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्यानुसार महाळुंगे पोलीस चौकीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर साबळे यांनी गुन्हे तपास पथक, महाळुंगे पोलीस चौकी यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत व क्राइम मैपिंग करुन पेट्रोलिंग व सी सी टि व्ही पाहुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अंमलदारांनी वारंवार चोरी होणा-या ठिकाणांची पाहणी करून मोटार सायकल चोरी गुन्हे घडले तारीख, वेळ, ठिकाण पडताळणी करुन घडलेल्या गुन्हयांची काईम मॅपिंग तयार करण्यात आले, त्यानुसार विविध ठिकाणाचे सी सी टि व्ही फुटेजची पाहणी व पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली.

दिनांक ११/०८/२०२२ रोजी महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार बिराजदार, पो.नाईक वडेकर, पो. ना. काळे, पो.शिपाई गायकवाड, पो.शि. माटे यांनी मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने सी सी टि व्हि फुटेज व गुप्त बातमीदाराच्या आधारे महेश भगवान गिरी वय २२ वर्षे रा. मेदनकरवाडी ता. खेड जि. पुणे यास ताब्यात घेतले असता त्याने मोटार सायकल चोरले असल्याची कबुली दिली. त्यास चाकण पोलीस स्टेशन अंकीत महाळुंगे पोलीस चौकी गु.र.नं. १२७७/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ गुन्हयामध्ये अटक करुन न्यायालयाने पोलीस कोठडी मंजुर केल्यावर अधिक तपास केला असता त्यांनी अजुन चार मोटार सायकली चोरल्या असल्याचे सांगितले. वरील आरोपी यांनी चोरलेल्या मोटार सायकली महाळुंगे पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

 कंपनीतील कामगारांना आवाहन

एमआयडीसी मधील कंपन्यामधील कामगारांना आवाहन करण्यात येते की, कामगारांनी आपल्या मोटार सायकली कंपनीच्या आवारात कंपाऊंडच्या आत योग्य सिक्युरिटी / सीसीटीव्ही निगराणी खाली पार्क कराव्यात तसेच मोटार सायकलीला मेटल टायर लॉक लावावे व हॅन्डल लॉक करून पार्क कराव्यात जेणेकरून कंपनी आवारामधुन होणा-या चोरीस प्रतिबंध निर्माण होईल.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, सपोफौ पानसरे, पो. हवालदार राजु कोणकेरी, जयवंत शिकारे, युवराज बिराजदार, विठठल बडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, अनिल महाजन, संतोष होळकर, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, गणेश गायकवाड, अमोल माटे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर, राहुल मिसाळ यांनी केली आहे. पुढील तपास महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस हवालदार शिकारे करीत आहेत.