शिरुर दिनांक ( वार्ताहर ) गणेशोत्स्वानिमित्त डंबेनाला गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजिक करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात २५ हून आधिक जणांनी रक्तदान केले . गणेशोत्सवानिमित्त डंबेनाला मित्र मंडळ यांनी यशवंतराव चव्हाण चौकात हे शिबीर आयोजित करण्यात आले . शिबीराकरीता अष्टविनायक ब्लॅड बॅक उपस्थित होते . डंबेनाला मित्र मंडळ हे वर्षभर विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करीत असते . शहरातील गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप , यशवंतराव चव्हाण स्मृति व्याख्यानमालाचे आयोजन केले जाते . मागील काहीवर्षापासून मंडळाचा वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते . यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब झाडगे , उपाध्यक्ष संतोष शेजवळ , संजय बारवकर ,ॲड सतीश गवारी , मनोज ओतारी ,माधव मुंडे , अभिजीत ओतारी , ॲड .प्रदीप बारवकर ,विशाल गांधी , किशोर परदेशी , कन्हैय्या दुगड , दत्ता  अभंग आदी उपस्थित होते . शिबीराला डॉ वैशाली वाखारे , शशिकला काळे , डॉ . सुभाष गवारी , योगेश भोसले , यांनी भेट दिली .