औरंगाबाद :-,दि.१५ स.(दीपक परेराव) औरंगाबाद जिल्ह्यातील कु.मृण्मयी मनोज जोशी ही १९ सप्टेंबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी अमेरिका (USA) ला जाणार आहे. परंतु त्या ठिकाणी खेळण्यासाठी आवश्यक असणारे क्रीडा साहित्य तिच्याकडे उपलब्ध नसल्याची माहिती मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मृण्मयीला १ लाखाची मदत केली, या मदतीमुळे मृण्मयीचा अमेरिका येथे आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

या सहकार्य बद्दल मृण्मयी हिने दानवे साहेबांचे आभार मानले.