हिवरे ता. शिरुर येथील मांदळवाडी सह परिसरात कायमस्वरूपी पाण्याची टंचाई जाणवत असल्याने येथील दानशूर खैरे दाम्पत्याने गावातील पाण्याची टंचाई दूर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून गावासाठी चक्क एक कोटी रुपयांचा कृषी सिंचन प्रकल्प उभारुन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते या कृषी सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण केले आहे.
हिवरे ता. शिरुर हे गाव दुष्काळी समजले जाणारे गाव असल्याने येथे प्रत्येक वर्षी पाण्याचा दुष्काळ जाणवत असताना येथील दिपक खैरे व दिपाली खैरे या दांपत्याने गावच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा संकल्प केला, दरम्यान गावातील पाहणी करत येथील काशीतळे येथील चासकमान कालव्याच्या कडेला दोन गुंठे जागा विकत घेत येथे विहीर बनवत येथून तब्बल साडेपाच किलोमीटर पाईप लाईन करत मांदळवाडी येथील पाझर तलाव दुरुस्त व खोलीकरण करत येथील तलावात पाणी साठवण करण्यास सुरुवात करण्यात आली, सदर प्रकल्पाने गावातील शेकडो हेक्टर जमिनी पाण्याखाली आली असल्याने शेती हिरवीगार होऊ लागल्याने शेतकऱ्यांचा दुष्काळ आता हटणार आहे, सदर प्रकल्प सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला, यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समितीच्या माजी उपसभापती सविता पऱ्हाड, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमोल जगताप, शुभांगी पडवळ, उद्योजक सदाशिव पवार, सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, गणेश सस्ते, सरपंच दिपाली खैरे, उपसरपंच नयना मांदळे, माजी सरपंच दिपक खैरे, शारदा गायकवाड, माजी उपसरपंच विश्वनाथ शिर्के, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आढळगे, संध्या गायकवाड, हौसाबाई जगताप, चेअरमन राजेंद्र साळुंके, तंटामुक्ती अध्यक्ष शरद तांबे, उपाध्यक्ष अनिल साळुंके, रेवननाथ जाधव, आनंदा तांबे, संतोष जाधव, फक्कड साळुंके, जालिंदर मांदळे, संतोष गायकवाड यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी बोलताना समाजात अनेकांकडे भरपूर पैसा असतो मात्र समाजासाठी खर्च करण्याचे दातृत्व लागते, खैरे दाम्पत्याचे कार्य समाजासाठी दिशा देणारे आणि शेतकऱ्याच्या हिताचे असल्याचे मत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर प्रास्ताविक अमोल जगताप यांनी केले आणि सरपंच दिपाली खैरे यांनी आभार मानले.