शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अंशकालीन सभापती पदावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शासन निर्णयान्वये श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, अंशकालीन सभापती, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे . दरम्यान माजी नगरसेविका अंजली मयुर थोरात यांनी आढळराव यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्या बद्दल अभिनंदन केले आहे