शिरुर दिनांक ( वार्ताहर )आमदाबाद विद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आमदाबादच्या पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालयाने गावातील सेवानिवृत्त शिक्षकांना सन्मानित केले.यामध्ये माजी मुख्याध्यापक फक्कडराव थोरात , माजी मुख्याध्यापक रामदास पवार , रामदास थोरात यांचा समावेश होता. इ.दहावीच्या विद्यार्थ्यांनी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. श्रीकृष्ण मंदिरात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले.या कार्यक्रमासाठी ग्रा.पं.सदस्य राजेंद्र शिंदे, माजी ग्रा.पं.सदस्य अविनाश सोनार, रमेशराज शास्त्री पातुरकर, माजी विद्यार्थी व तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश थोरात, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती थोरात जि.प.शाळेचे मुख्याध्यापक गांधी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.माजी विद्यार्थी युवा उद्योजक मंगेश थोरात यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कॉच्श्युम देणार असल्याची घोषणा यावेळी केली .