शिरुर: पुण्यातून अहमदनगरला गोमांस विक्रीसाठी येणार असल्याचे शिरुर पोलिसांना पुणे ग्रामीण कंट्रोल वरुन कळवले. त्यामुळे शिरुर पोलिसांनी तातडीने हालचास करत आज (दि 23) रोजी पहाटे 4:30 च्या सुमारास पुणे-नगर रोडवर सतरा कमान पुल इथं नाकाबंदी करत अंदाजे 650 किलो गोमांस वाहतुक करणाऱ्या गाडीसहित दोन जणांना अटक केली असुन 1) शाहरुख इसुफ खान (वय 29), 2) समीर अब्दुल गणी शेख (वय 21) रा. गोविंदपुरा मुकुंद नगर ,अहमदनगर असे अटक केलेल्या व्यक्तींची नाव आहेत. याबाबत पोलीस अंमलदार अशोक भगवान चितारे यांनी फिर्याद दिली आहे. 

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण कंट्रोलने शिरुर पोलिसांना एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातुन गोमांस अहमदनगर येथे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याचा मेसेज मिळाला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शिरुर येथील सतरा कमान पुलाजवळ नाकाबंदी केली. यावेळी पहाटे 4:30 च्या सुमारास पुण्याहुन-नगरकडे जाणाऱ्या काळ्या रंगाच्या स्कॉपिओ क्रं एम एच 12 ई एक्स 7158 मधुन अंदाजे 650 किलो 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचे विक्रीसाठी जाणारे गोमांस जप्त करण्यात आले. 

सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार विनोद काळे, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार राजू मांगडे यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहेत.