भारतीय कृषी विमा कंपनी कार्यालयाचे उद्घाटन गंगापूर खुलताबाद चे आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान पीक विमा योजना व त्यातील तरतुदी बाबत ता. कृ.अ. तारगे यांनी माहिती दिली सततच्या पावसामुळे शेतीत पाणी साचल्याने झालेल्या नुकसानीची माहिती संबंधित शेतकर्यांनी पीक विमा कंपनी किंवा ता. कृ. अधिकारी यांचेकडे देणे आवश्यक आहे जेणेकरून पीक विमा योजनेंतर्गत संयुक्त पाहणी द्वारे नुकसान भरपाई मिळेल... याकामी सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांनी प्रत्येक गावात बैठक घेऊन पीक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांना प्रक्रिया समजून द्यावी.अशा सुचना आमदार प्रशांत बंब यांनी प्रशासनाला दिल्या व सर्व नागरीकांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देवून अतिवृष्टी अथवा सतत पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी यांना योग्य मार्गदर्शन व मदत करणेबाबत आदेशीत केले...

यावेळी प्रमुख उपस्थिती तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी विजय परदेशी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, संचालक रामेश्वर मुंदडा, नगरसेवक प्रदिप पाटील, माजी सभापती संतोष पाटील जाधव, संतोष अंबिलवादे ,शेतकरी प्रतिनिधी दत्तू पाटील कराळे, मंडळ कृषी अधिकारी तुर्काबाद एस जी बंडगर, मंडळ कृषी अधिकारी गंगापूर पश्चिम के जी बचुटे, मंडळ कृषी अधिकारी गंगापूर व्ही बी मोरे , सर्व कृषी सहाय्यक, सर्व कृषी पर्यवेक्षक, भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका समन्वयक प्रवीण जगताप तसेच गंगापूर तालुक्यातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.