यवतमाळ, : चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी इतर मागास वर्ग ( ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरु करण्यात यावे अन्यथा वसतिगृह निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना दयावा, अशी मागणी मराठा सेवा संघ यवतमाळच्या वतीने  मुख्यमंत्री, यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदना व्दारे करण्यात आली.  

निवेदन देतांना सुनिल कडू, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रविण भोयर, शशिकांत खडसे, डॉ़. प्रदिप राऊत, विनायकराव देशमुख, किशोर चव्हाण ईत्यादी उपस्थित होते.