शिरुर दिनांक ( वार्ताहर ) इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद मध्ये शिरुर मधील डॉक्टरांनी  सहभागी होवून सदर घटनेचा निषेध केला . त्याच बरोबर शहरातील हुतात्मा स्मारका पासून शहर व तालुक्यातील डॉक्टरांनी , केमिस्ट व पॅथालॉजिस्ट यांनी काळ्या फिती लावून शिरुर तहसिल कार्यालयावर मोर्चा नेल्या. त्याठिकाणी नायब तहसिलदार स्नेहा गिरगोसावी व पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांना निवेदन देण्यात आले आहे . हुतात्मा स्मारका पासून निघालेल्या हा मोर्चा पुणे नगर रस्त्याने शिरुर तहसिल कार्यालयात गेला . मोर्चात इंडियन मेडिकल असोसिएशन शिरुर चे अध्यक्ष डॉ . राहुलदत्त पाटील व सचिव डॉ . स्वप्नील भालेकर ,मावळाई प्रकाशनचे डॉ . सुभाष गवारी , लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक , माजी नगरसेवक विनोद भालेराव , डॉ . विक्रम घावटे ,जिल्हा जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , नोटरी रवींद्र खांडरे , नोटरी प्रदीप बारवकर , माजी नगरसेवक मंगेश खांडरे , किरण बनकर , कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष नोटरी किरण आंबेकर, डॉ . प्रवीण गायकवाड , श्यामकांत वर्पे , राणी कर्डिले , डॉ . संतोष पोटे आदी सहभागी झाले होते . यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ९ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकत्ता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या अत्यंत निंदनीय घटनेमुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या घटनेत एका तरुणी डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतरच्या काळात या प्रकरणातील अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणे वागणूक दिली आणि तपासातही निष्काळजीपणा दाखविला. तसेच स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आणि रुग्णालयातील विविध विभागांची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने १७ ऑगस्ट २०२४ रोजी निषेध दिन पाळून सकाळी ६ वाजेपासून १८ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांसाठी देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, परंतु नियमित ओपीडी आणि तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. या माध्यमातून वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी न्याय्य मागण्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तहसिल कार्यलया समोर माजी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार ,माजी नगरसेवक रवींद्र धनक , डॉ .सुनिता पोटे , डॉ .स्मिता बोरा , डॉ . भाउसाहेब पाचुंदकर , निमाचे डॉ . पवन सोनवणे , होमिओपॅथी संघटनेचे बाबा शिंदे , फार्मसी संघटनेचे बाबाजी गलांडे , पॅथालॉजिकल संघटनेचे उदय शिंदे , शिरुर वकील संघटनेचे अध्यक्ष अमित खेडकर , डॉ . अशोक साबळे ,माजी नगरसेवक विनोद भालेराव , संजय बारहाते , आदीची यावेळी भाषणे झाली . खासदार डॉ . अमोल कोल्हे यांनी ही मोबाईलवरुन यावेळी मनोगत व्यक्त करुन सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला .