शिरूर दिनांक ( वार्ताहर ) अर्धवट उघडा असलेल्या दरवाज्यामधून अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून घरामध्ये देवा-याच्या खाली असलेल्या लाकडी कप्यात ठेवलेले साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे१ लाख ,७८ हजार  रूपये किमंतीचे दागिने चोरुन नेले . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष भिकोबा कदम वय ७० वर्षे धंदा शेती रा मानेवाडी शिरसगाव काटा शिरूर जि पुणे यांनी अज्ञात चोरटा विरोधात फिर्याद दिली आहे . दिनांक ०८/०८/२०२४ रोजी रात्री १२.००ते दि ०९/०८/२०२४ रोजी पहाटे ०५.०० वा.चे दरम्यान शिरसगावकाटा ता शिरूर जि पुणे येथे कदम यांच्या घराचा अर्धवट उघडा असलेल्या दरवाज्यामधून अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून घरामध्ये देवा-याच्या खाली असलेल्या लाकडी कप्यात ठेवलेला एकूण १,७८,००० /- रूपये किंमतीचा ऐवज त्यामध्ये ९५ हजार रु किमंतीचे १९ ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण,१५ हजार रु किमंतीचे ३ ग्रॅमचे गळयातील डोर्ले , ५ ग्रॅम वजणाची पिळयाची २५ हजार रु किमंतीची अंगठी ,१५ हजार रु किमंतीची ३ग्रॅम वजना ची लेडीज अंगठी, १५ हजार रु किमंतीचे ३ ग्रॅम गळयातील मणी , साडेसात हजार रु किमंतीचे दीड ग्रॅम गळयातील डोर्ले , अडीच हजार रु किमंतीची अर्धा ग्रॅम नाकातील चमकी , ३ हजार रु . किमंतीचा चांदीचा पायातील जोडवी जोड असा ऐवज चोरट्याने चोरुन नेला आहे . यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे करीत आहेत .