शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पेट्रोलिंग दरम्यान वाहनांची तपासणी करताना विधीसंघर्षित मुलाकडच्या सॅक मध्ये बेकायदेशीररीत्या कोयत्या आढळून आला असून भारतीय  हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर पोलीस स्टेशनचे रघुनाथ हाळनोर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे . दिनांक ६ ऑगस्ट 2024 रोजी दुपारी सव्वातीन च्या सुमारास शिरूर गाव मधील बाबुरावनगर येथे पोलीस पेट्रोलींग दरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना दुचाकी गाडीची तपासणी करीत असताना गाडी वरील चालकाने त्याच्याकडील सॅकमध्ये बेकायदेशीर रित्या कोयता बाळगलेला मिळुन आला .या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . कोयता व दुचाकी वाहन पोलीसांनी जप्त केले आहे . याप्रकरणी पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जगताप तपास करीत आहे .