शिरुर दिनांक ( वार्ताहर ) नकली नोटा आहेत मी चेक करुन देतो असे सांगून हातचलाखीने नोटांचा बंडलातील १९ हजार रुपये लंपास करण्यात आले . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिमन्यु शंकरराव कांबळे, वय 69 वर्षे, व्यवसाय सुखवस्तु, रा. आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे. यांनी फिर्याद दिली आहे . कांबळे हे न्हावरा ता. शिरूर, जि. पुणे गावचे येथील बँक ऑफ इंडीया मध्ये गेले असता बँकेमधुन 50,000/- रूपये काढुन बँकेमध्ये असलेल्या बॅचवर पैसे मोजत असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांचे शेजारी येवुन बसला व या पैशामध्ये नकली नोटा आहेत मी चेक करून देतो असे म्हणुन त्यांच्या कडील 50,000/- रूपये घेवुन त्यामधील १९ हजार रुपये हातचलाखीने काढुन घेतले याबाबतव्गा आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा थेउरकर करत आहेत .