बीड (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे ही देशासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. परंतु देशात वाढलेली महागाई. बेरोजगारी, उपासमारी आणि सर्वसामान्य जनतेची होत असलेली होरपळ याचे काय असा सवाल कामगार नेते गौतम आगळे यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रधानमंत्री मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले. यानुसार देशातील जनता त्याला प्रतिसाद देत आहे. परंतु या निमित्ताने अनेक ठिकाणी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा चा अपमान होत असलेल्या घटनाही घडत आहेत. अनेक ठिकाणी तिरंगा वरील अशोक चक्र गायब झाल्याचे दिसून आले आहे. हे राष्ट्रध्वजाचा अवमान करणारेच आहे.
आज घरोघरी रोजगार देण्याऐवजी घरोघरी तिरंगा दिला जातोय..... देशप्रेम काल आज आणि उद्याही राहील हो पण पोटाला लागणारा चिमटा उपासमारी, महागाई, काळा पैसा, रोजगार, याच काय? यावर ठोस उपाय करणारा प्रधानमंत्री हवा आहे.
नुसतं वाजवायला लावुन आणि फडकायला लाऊन काहीच उपयोग नाही..... तेव्हा देशातील सर्व जनतेने याचे अवलोकन करावे असे आवाहन गौतम आगळे यांनी केले आहे.