शिक्रापूर चाकण रस्त्यावर जातेगाव खुर्द गावच्या हद्दीमध्ये दुचाकीहून चाललेल्या युवकाला पाठीमागून आलेल्या कंटेनरची धडक बसून अक्षय विठ्ठल कंद्रूप या युवकाचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

                शिक्रापूर चाकण रस्त्यावरुन शिक्रापूर बाजूने चाकण बाजूकडे अक्षय कंद्रूप या युवक २३ जुलै रोजी रात्री अकरा चे सुमारास त्याच्या एम एच १२ पि जि ६४४८ या बुलेट दुचाकी हून चाललेला असताना जातेगाव खुर्द येथील पंजाबी खालसा हॉटेल समोर शिक्रापूर बाजूने चाकण बाजूकडे आलेल्या एच आर ५५ वाय ५२२४ या कंटेनरची अक्षयच्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला, यावेळी अक्षय जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शिक्रापूर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी अक्षय विठ्ठल कंद्रूप वय २४ वर्षे रा. करंदी ता. शिरूर जि. पुणे याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले, याबाबत शिवाजी बबन कंद्रूप वय ६२ वर्षे रा. करंदी ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी एच आर ५५ वाय ५२२४ या कंटेनर चालकावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश माने हे करत आहे.