शिरुर दिनांक ( वार्ताहर ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२३-२४ मधील शिरूर तालुक्यातील राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान सोहळा रविवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी १० वा. शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मनसेचे उपजिल्हाप्रमुख महिबूब सय्यद यांनी दिली आहे . यावेळी माजी सनदी आधिकारी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर , सहा संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्या ,पुणे डॉ ज्योति परिहार , प्राचार्य बी. डी. कुलकर्णी (सदस्य, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे) मनसेचे नेते अनिल शिदोरे नंदू (भाई) तळवडेकर (अध्यक्ष, मनसे सुरक्षा रक्षक सेना) ,सिनेदिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे , गटविकास आधिकारी महेश डोके, ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव , मनसे नेते बाबू वागस्कर , मनसे चित्रपट सेनेचे परदेशी , तहसिलदार बाळासाहेब म्हस्के , मनसेचे किशोर शिंदे ,अजय शिंदे ,बाळा शेडगे, साईनाथ बाबर, हेमंत बत्ते, रविंद्र गारूडकर , रामदास दरेकर ,ॲड .मकरंद पाटे आदी उपस्थित राहणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले .

Sponsored

द मून रेस्टॉरेंट एवं देव क्लासेज - बूंदी

द मून रेस्टॉरेंट एवं देव क्लासेज की ओर से समस्त बूंदी वासियों को रूपचौदस, धनतेरस, दीपावली एवं गोवर्धन पूजा की हार्दिक बधाइयाँ व शुभकामनाएं