शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर येथील जोशीवाडी परिसरातून अज्ञात चोरट्याने स्किफ्ट कार चोरुन नेली आहे . यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास बबन राऊत वय 57 वर्ष , धंदा खरेदी विक्री राहणार समृद्धी अपार्टमेंट जोशी वाडी ता शिरूर जि पुणे.यांनी फिर्याद दिली आहे . दि. 20 जुलै रोजी ही चोरीची घटना झाली .राउत यांनी मारूती स्वीप्ट डिझायर कंपनीची कार पांढरे रंगाची तिचा पासिंग क्र . एम एच -१२ एमएफ 4028 हि दि २०/०७/२०२४ रोजी राट्री १२:३० वा ते सकाळी ११/०० वा चे दरम्यान समृध्दी अपार्टमेंट जोशीवाडी शिरूर ता शिरूर जि पुणे येथे इमारती जवळ मोकळया जागेत लॉक करून लावलेली असताना अज्ञात चोरटयाने चोरून नेली. सदर चोरीचा तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे करीत आहेत .