औरंगाबाद :- शैलेंद्र खैरमोडे 

शहरातील एन डी पी एस पथकाला गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , जॉलीबोर्ड कंपनीलगतच्या मोकळया जागेत नारेगाव औरंगाबाद येथे एक इसम गुगीकारक गांजा ( कॅनबीस वनस्पती ) नावाचा अंमली पदार्थाची चोरटी वाहतुक करण्यासाठी येणार आहे . अशी बातमी देवून कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता व बातमीची शहानिशा करण्याकरिता बातमीदाराने सांगितलेल्या ठिकाणी स्टाफ व पंचांसह पोलीसांनी जावून त्या ठिकाणी सापळा रचला बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे सदर ठिकाणी एक इसम एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीसह दिसुन आला . त्यास एन डी पी एस पथकाने पकडले असता त्याला त्याचे नाव गाव विचारले असता , भारत गगन गागडे , वय -२१ , रा . गल्ली नं .०९ बलुच गल्ली , नारेगाव औरंगाबाद असे सांगीतले त्याची अंगझडती घेत असतांना त्याचे हातात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीतुन उग्र वास येत असल्याने त्या पिशवीची झडती घेतली असता , त्यात गांजा ( कॅनबीस वनस्पती ) असल्याचे दिसुन आले . त्याचे ताब्यात असलेल्या गांजाचे वजन काटयावर वजन केले असता , ४.२७ किलो गांजा मिळुन आला व अंगझडतीमध्ये १० हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण ५८.६८८ / - रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन मिळुन आल्याने नमुद आरोपी विरुध्द पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. सिडको , येथे गु.र.नं. २९४/२०२२ अन्वये कलम एन डी पी एस कायद्या २० ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . सदरची कार्यवाही . पोलीस आयुक्त डॉ . निखील गुप्ता , पोलीस उप आयुक्त ( मुख्यालय ) अपर्णा गिते , सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , आविनाश आघाव , सहायक पोलीस निरीक्षक , हरेश्वर घुगे , सफो नसीम खान शब्बीर खान , पोलीस अंमलदार विशाल सोनवणे , महेश उगले , धर्मराज गायकवाड , सुरेश भिसे , दत्ता दुभळकर , प्राजक्ता वाघमारे सर्व नेमणुक एन डी पी एस पथक औरंगाबाद व मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचे अभिजित खोतकर , फोटोग्राफर राजेंद्र चौधरी यांनी केली .