शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरूर मर्चंट आर्थिक निधी लिमिटेड संस्थेचा दुसरा वर्धापन दिनानिमित्त शिरूर नगरपालिका शाळा व टाकळी हाजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले . यावेळी शिरूर नगरपरिषदच्या मुख्याधिकारी स्मिता काळे , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरदचंद्र पवार ) चे शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी ॲक्सिस बँक क्लस्टर हेड पुणे संतोष काशिदकर माजी नगरसेवक मंगेश खांडरे डॉ. वैशाली साखरे, राणी कर्डिले , गीता आढाव , नोटरी रवींद्र खांडरे श्रीकृष्ण बारहाते , नजीर खान , नितीन बारवकर आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थिताचे स्वागत शिरुर मर्चंट आर्थिक निधी लिमिटेड संस्थेचे चेअरमन अरुण रामचंद्र कुलकर्णी यांनी केले . त्यांनी सांगितले की संस्थेची स्थापना - सन २०२२ रोजी झाली असून ठेवी - ३ कोटी ९४ लाख रु तर गुंतवणूक - ९५ लाख रु एवढी आहे. सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून संस्थेचा दुसरा वर्धापनदिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .