शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पुणे येथील चैताली मेडिकोच्या चैताली कटारिया ( बोरा ) यांची एमएसपीसी कॉंन्सिल पुणे विभागाच्या सहसंयोजकपदी निवड झाली आहे . जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष AIOCD व MSCDA) यांच्या मार्गदर्शनाखाली व केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे चैताली कटारिया ( चैताली मेडिको ) यांची एमएसपीसी कॉन्सिल च्या पुणे विभागासाठी सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे . कटारिया या पुणे शहरातील प्रसिध्द चैताली मेडिकोच्या प्रमुख असून औषध विक्रेत्याचे संघटन व प्रश्न सोडविण्याबाबत सातत्याने कार्यरत आहेत . त्याच्या निवडीबद्दल केमिस्ट असोसिएशनचा वतीने अभिनंदन करण्यात आले आहे . माझ्यावर संघटनेने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वाना बरोबर घेवून काम करणार असल्याचे कटारिया यांनी निवडीनंतर सांगितले. सी .ए .पी. डीचे अध्यक्ष संदिप पारेख केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर आदीनी कटारिया यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे .