मुंबई दि.14 ऑगस्ट – मराठा आरक्षणाचा आवाज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. खोपोली येथील माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. अपघातामध्ये विनायक मेटे यांना मोठी दुखापत होवून वेळीच मदत न मिळाल्यामुळे त्यांचं निधन झाल्याचे वृत्त आले आहे.

पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोगंराच्या कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विनायक मेटे यांच्यावर पनवेलच्या एमजीएमम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते.

अपघातात मेटे यांचं निधन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही आज पहाटे घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालापूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते.

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी आहेत. मेटे सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार झाले. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य राहिले. शिंदे सरकारच्या शपथविधीनंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी येईल असे भाकीत केले जात असताना आज त्यांच्या निधनाचे वृत्त आले. यामुळे बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.